Grampanchayat elections declared ग्रामपंचायत निवडणुकीविषयी महत्त्वाचे बातमी आहे राज्यातील मुदत संपणाऱ्या व रिक्त झालेल्या जागा साठी पोटनिवडणूक होणार आहे तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीसाठी सुद्धा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे याविषयीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषीत
महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. Grampanchayat elections declared' त्यानुसार खालील ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे.
- माहे जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीमधील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे.
- नव्याने स्थापन झालेल्या व सन 2022 मध्ये चुकीचे प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदासाठी संगणक प्रणालीद्वारे निवडणूक होणार आहे.
- निधन राजीनामा अपात्रता व इतर अन्य कारणामुळे ग्रामपंचायत मध्ये रिक्त झालेल्या जागांसाठी पारंपारिक पद्धतीने पोटनिवडणूक होणार आहे.
- एकूण किती ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे.
राज्यातील मुदत संपणाऱ्या एकूण 2361 ग्रामपंचायत पैकी 2359 ग्रामपंचायत साठी सदस्य पदासह थेट जनतेतून सरपंच निवडीसाठी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे.
तसेच निधन राजीनामा अपात्रता व इतर अन्य कारणामुळे रिक्त झालेल्या एकूण 28 ग्रामपंचायतीमधील 2950 सदस्यांच्या व 130 थेट सरपंचाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम.
निवडणूक प्रक्रिया 6/10/2023 रोजी पासून सुरू होणार आहे.
दिनांक 25/10/2023 रोजी दुपारी तीन वाजेनंतर उमेदवारांची अंतिम यादी व त्यांचे चिन्ह प्रसिद्ध करण्यात येणार आहे. Grampanchayat elections declared
मतदान दिनांक - आवश्यक असल्यास निवडणूक बिनविरोध न झाल्यास रविवार दिनांक 5/11/2023 रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या वेळेत मतदान होणार आहे.
मतमोजणी व निकालाचा दिनांक -
- सोमवार दिनांक 6/11/2023 रोजी मतमोजणी करून निवडणुकांचे निकाल घोषित करण्यात येणार आहे.
- नक्षलग्रस्त दुर्गम भागातील ग्रामपंचायतींची मतमोजणी मंगळवार दिनांक 7/11/2023 रोजी होणार आहे.
तर याप्रमाणे निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घोषित करण्यात आला आहे.
0 Comments